आपलं शहर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; वॉर्ड पातळीवरील कामांना वेग..

कोरोना संकट काळात पालिकेची सर्व यंत्रणा आरोग्य उपाययोजना आणि लॉकडाऊनशी संबंधित कामाला लावण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे बंद पडलेली विकासकामे आता हळूहळू मार्गावर येत आहेत.

मोठ्या कामांसाठी निविदा सुरू झाल्यानंतर. पालिकेने आता वोर्ड पातळीवरील कामांकडे लक्ष वळवले आहे. 24 विभागांतील तब्बल 233 कामांसाठी 18 कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

यामध्ये लाद्या बसवणे, शौचालयांची दुरुस्ती, चौकांचे सुशोभीकरण, गटारांचे बांधकाम ही कामे कोरोनामुळे पूर्णपणे बंद पडली होती. प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन ई-टेंडरमार्फत एक ते तीन लाखांपर्यंतच्या कामांसाठी निविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 233 कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

पुढील वर्षी महापालिका निवडणुक होणार आहे. लॉकडाऊनमुळे स्थगित झालेली कामं पूर्ण करण्यासाठी अनेक नगरसेवक आपल्या विभागातील कामांसाठी निविदा भरत आहेत.

(On the backdrop of the upcoming municipal elections; Speed ​​up ward level work.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments