फेमसखूप काही

IND vs PAK : एकाच सामन्यात 10 विकेट घेणारा भारताचा धडाकेबाज खेळाडू

बावीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या जीम लॅकरच्या रेकॉर्डची बरोबरी करीत एका टेस्ट इनिंगमध्ये 10 विकेट घेणारा दुसरा क्रिकेटर ठरला. अनिल कुंबळेच्या तुफान गोलंदाजीमुळे पाकिस्तान अवघ्या 26.3 ओवर्समध्ये 74/10 अशी स्थिती होती. (On this day that year Anil Kumble became first Indian to take all wickets in test innings)

नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला (सध्याचे अरुण जेटली स्टेडियम) वर खेळला गेलेला हा सामना अर्थातच भारताच्या नावावर आला आणि भारताने या सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली.

काय झाले होते त्या मॅचमध्ये
सदागोप्पन रमेश आणि माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन या दोघांनी दमदार खेळी करत भारताला पहिल्या इनिंगमध्ये 252 धावांची मजल मारली. याउलट पाकिस्तानला मात्र आपला डाव 172 वर गुंडाळावा लागला, आणि भारताला 80 धावांची लीड मिळाली.

सामन्याच्या दुसर्या इनिंगमध्येही रमेशने दमदार खेळीचे प्रदर्शन करत 96 धावा केल्या. तसेच सौरव गांगुलीच्या 60 धावांमुळे भारताला दुसर्या इनिंगमध्ये 339 धावा करता आल्या.

यावेळी सामन्याचे अवघे दोन दिवस शिल्लक असताना पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि सईद अन्वर यांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावा केल्या.

लंचनंतर मॅच बदलली
लंचपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या होती 101/0. मात्र लंचनंतर अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर आफ्रिदीला 41 धावांवर माघारी पाठवले. आफ्रिदीनंतर लगेचच पाकिस्तानला एजाज अहमदच्या रुपाने आणखी एक धक्का बसला. त्यानंतर कुंबळेने एकावर एक अशा नऊ विकेट घेतल्या आणि शेवटची ऐतिहासिक 10वी विकेट त्याने वसीम अक्रमची घेतली, आणि एका टेस्ट इनिंगमध्ये 10 विकेट घेणार पहिला भारतीय खेळाडू ठरला.

अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकीर्दीत भारतासाठी एकूण 132 कसोटी सामने खेळले. कुंबळे हे कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे तिसरे स्पिनर आहेत आणि त्यांच्या नावावर एकूण 619 विकेट आहेत. कुंबळेंपेक्षा अधिक विकेट असणार्यांमध्ये पहिले आहेत मुथैय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708). अनिल कुंबळेंनी 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments