खूप काही

लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली तर सुरू केला स्वतःचा व्यवसाय, आत दर महिन्यात सव्वा लाख रुपयांची बचत

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये फैजाबाद रोड वर मतियारी गावाच्या आधी बलाजीपुरम कॉलोनीच्या एका 2 बी एच के घरात ऑप्टिकल कंपनी च ऑफिस बनलेल आहे.हे एखाद्या कंपनीचे कार्यालय असल्याचे बाहेरून दिसणार नाही, पण इथे कंपनीच्या एमडी पासून ते अकांऊटंट पर्यंत बसले आहेत आणि छोट्या खोलीतून त्यांचे आउटलेट देखील चालवित आहेत. ऑप्टिकल पॉईंट कंपनीचे एमडी प्रशांत श्रीवास्तव म्हणतात की हे कार्यालय आता छोटे वाटले असले तरी 2025 पर्यंत आम्ही देशातील प्रत्येक मोठ्या शहरात कार्यालय सुरू करण्याची योजना आखली आहे. एवढेच नाही तर 22 लोकांची टीम राज्यभर प्रशांतच्या कंपनीत काम करत आहे.

50 हजारांची नोकरी गेली तर स्वतःचा व्यवसाय करायचा रिस्क घेतला.

प्रशांत म्हणतात की ” मी महराजगंज जिल्ह्याच्या छोट्याशा गावातील आहे. जमीन – संपत्ती नव्हती म्हणून मी नोकरी साठी शहरात आलो. काही प्रेशर नवत पण अंगावर 4 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी होती.खूप मेहनत करून नोकरी लागली पण लॉकडाऊन मध्ये गेली म्हणून स्वतःचा व्यवसाय टाकला.”

सगळे वेगवेगळे बिझनेस आयडिया ट्राय केले. डेअ री पासून शेतीपर्यंत सगळे विचार केले. पण काहीच नाही झालं.गावी परत गेल्याने कुटुंबाला त्रास झाला असता.काही सुचत नव्हत म्हणून ज्या कंपनी मध्ये काम करत होतो तिथल्या मित्रांशी बोलून ऑप्टिकल मध्ये काय तरी स्वतःच केलं पाहिजे असा ठरवलं. पण व्यवसाय चालू करण्यासाठी पैसे लागतात आणि रिस्कही पण खूप असतो म्हणुन मी माझ्या वडिलांशी चर्चा केली. वडील म्हणाले ज्यात परफेक्ट आहेस तेच कर. त्यांनी मला साथ दिली.

पैसा फारसा नव्हता, वडिलांकडे रिटायरमेंटचा पैसा होता. काही एफडी तोडली आणि बायकोची बचतही घेतली आणि काही कर्ज घेऊन जुलैपासून आपली कंपनी सुरू केली.माझ्या सोबत जे जे लोक बेरोजगार झाले त्यांना नोकरी दिली.जेव्हा मी सगळ्यांना नोकरीसाठी ऑफर दिली तेव्हा ते नाही नाही बोलले. कंपनी नवीन होती म्हणून मी कोणावर जोरजबरदस्ती नाही केली. पण सग्यांनी मला सपोर्ट केला.

वेगवेगळ्या शहरांमधील त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्याने त्याचे दुकान त्याच्या दवाखान्यात उघडले. जवळपास अर्धा डझन शहरांमध्ये आमच्याकडे आउटलेट आहेत. आम्ही बाजारात प्रवेश करण्यासाठी चांगल्या प्रतीचे आणि कमी किंमतीचे चष्मा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे डॉक्टरांवर रूग्णांचा विश्वास वाढतो आणि आम्हाला नवीन ग्राहकही मिळतात. आत्ता दर महिन्यात 20-25 लाखाची चष्मा आणि लेंसची विक्री होते. सगळ्यांचा पगार आणि बाकी सगळं करून माझ्या कडे एक ते सव्वा लाख रूपये वाचतात. आता अस वाटत की मे हे आधी का नाही केलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments