खूप काहीआपलं शहर

प्रवाशांनो इथे लक्ष असूद्या; लालपरीचे लोकेशन आता मिळणार एका क्लिकवर…

“लालपरी” अहो म्हणजे आपली एसटी गेली अनेक वर्षे अविरत प्रवाशांची सेवा करते आहे. खेड्यापासून ते अगदी शहरापर्यंत लालपरीच्या सेवेचा सर्वजण लाभ घेतात. जशी समस्त मुंबईकरांसाठी लोकल आणि बेस्ट जितकी महत्तवाची आहे तितकीच किंबहुना त्याहूनही महत्तवाची आहे गावखेड्यांतल्या लोकांना ही लालपरी.

शाळेत किंवा कुठे कामासाठी जायचं असूदे गावातल्या लोकांचं हक्काचं वाहन म्हणजे एसटी. एसटी कधी येणार याची वाट बघत काहीवेळा प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. एसटी वेळेवर न येता भलत्याच वेळेस येते त्यामुळे विनाकारण प्रवाशांना कुठे जायचे असल्यास उशीर होतो.

मात्र आता तुमची ही एसटी कुठे आहे हे तुम्हाला लगेच कळू शकणार आहे. कारण, राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रातील सर्व एसटी बसमध्ये वेहीकल ट्रॅकिंग सिस्टीम (Vehicle Tracking System – VTS) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रणालीमुळे एसटी कुठवर पोहोचली आहे किंवा बस येण्यासाठी किती वेळ लागणार आहे याची संपूर्ण माहिती प्रवाशांना आपल्या स्मार्टफोनवर सहज मिळू शकणार आहे.

एमएसआरटी (MSRT) मोबाईल ॲप एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत तयार करण्यात आले आहे. या ॲपचा वापर केल्याने प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती लगेच मिळणार आहे. तसेच, ॲपमध्ये जवळचे बस स्थानक, बस कोणत्या स्थानकात पोहोचली, कोणत्या पुढील स्थानकात बसचा थांबा आहे आणि इतर सेवा उपलब्ध असणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments