कारण

नाना पटोले रेसमध्ये, अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल; विरोधी नेत्यांकडून टीकास्त्र…

महाविकास आघाडीच्या सरकारमधील विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Assembly Speaker Nana Patole) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विरोधीपक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच फैलावर धरलं आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीदेखील टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Ajit Pawar will not be reachable again, Nilesh Rane’s comment)

मविआतील धडाडीचे नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाशिवाय अजून एका पदाची निर्मीती केली जाणार आहे. तशी खलबतंदेखील मविआ सरकारमध्ये सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे.

नाना पटोले आल्यामुळे अजित पवारांची नॉट रिचेबल होण्याची वेळ आल्याचं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत; पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं हो,तं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे, म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय वर्तूळात नेमकं काय खलबतं चालतात, हे पाहणे गरजेचे असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments