आपलं शहर

मुंबईकरांनो पेट्रोल, डिझेलचे दर वाढले; जाणून घ्या आजचे दर…

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्याचा फटका सर्वसाधारण नागरिकांना सहाजिकच बसत आहे. आजही असाच बोजा सर्वसामान्यांवर पडला आहे. कारण मुंबई पेट्रोल आणि डिझेल वाढले आहेत. (Increase in petrol and diesel prices in Mumbai)

मुंबईत आज पेट्रोलची किंमत 95.46 रुपये इतकी आहे, तर डिझेलचा दर प्रतिलिटर 86.34 रुपये आहे. काल (14 फेब्रुवारी रोजी) मुंबईत पेट्रोलची किंमत 95.21 रुपये होती, तर डिझेलचा दर प्रतिलिटर 86.04 इतका होता.

आज पेट्रोल 25 पैशांनी महागलं आहे, तर डिझेल 30 पैसे प्रतिलितर रुपयांनी महागलं आहे. यात पॉवर पेट्रोलचे दर 98.24 रुपये प्रतिलिटर इतका आहे.

या सगळ्यावर मुंबईकरांनी नाराजी वर्तवली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने अनेक दुचाकीस्वारांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावरची गर्दी कमी झाल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. (Increase in petrol and diesel prices in Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments