कारण

नर्स आणि डॉक्टर्स देवासारखे आले.. पंतप्रधानांनी मानले कोरोना वॉरियर्सचे आभार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलत होते. त्यावेळी ते काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केलेल्या एका विधानावर बोलत होते. तिवारी यांनी म्हटले होते की, “कोरोनाच्या परिस्थितीत भारत देवाच्या कृपेने सुरक्षित राहिला.” याच विधानावर पंतप्रधान यांनी टिप्पणी केली.

“हे खरं आहे की जेव्हा संपूर्ण जग कोरोनामुळे हादरले होते त्यावेळी देवाच्या कृपेने आपण सुरक्षित राहीलो. आपले सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस देवाच्या रुपात धावून आले होते.” असे ते म्हणाले.

“सर्व डॉक्टर्स आणि नर्स आपापल्या घरी जाऊन आपल्या लहान मुलांना सांगत की आम्ही आता पुढचे 15 दिवस घरी येऊ शकणार नाही. कारण त्यांनी देवाचे रुप घेतले होते. त्यामुळे आपण या महाभयंकर कोरोना विषाणूवर विजय मिळवू शकलो. आपल्या सफाई कामगांरासाठी देखील हे काम जीवावर बेतण्यासारखे होते. कुणीही कोरोनाबाधीत रुग्णांच्या जवळ जात नसत. त्यावेळी आपले सफाई कामगार त्याजागी जाऊन तिथला परिसर स्वच्छ करायचे.” यावेळी पंतप्रधानांनी कोरोना वॉरियर्सची प्रशंसा करित त्यांना “भगवान का रूप” म्हणून संबोधले.

देव वेगवेगळ्या रूपात धावून आला आणि आपण जेवढी त्याची प्रशंसा करू तेवढी नवीन शक्ती आपल्यात निर्माण होतांना दिसेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments