खूप काही

PNB देतय बाजारभावापेक्षा 500 रुपये स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी

देशातली दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आता तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी मिळवून देत आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) ची 11वी सिरीज सबस्क्रिप्शन साठी सुरू झाली आहे.

या स्कीममध्ये तुम्ही 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसंच ऑनलाईन खरेदी केल्यावर तुम्हाला प्रती ग्राम 50 रुपयांची सुट मिळेल.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचे फायदे:
> खरेदी करण्यास सोपे
> सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्ही या बाँडला डिमॅट फॉर्ममध्ये ठेवू शकता
> स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्ही याची ट्रेडिंग करू शकता
> या बॉन्डवर तुम्हाला कर्ज घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

किती सोनं खरेदी करता येईल:
> स्कीम अनुसार व्यक्तिगत आणि हिंदू अविभक्त कुटुंब एका आर्थिक वर्षात 1 ग्राम आणि जास्तीत जास्त 4 किलो ग्रॅम सोनं खरेदी करू शकता
> ट्रस्ट आणि इतर घटक दरवर्षी 20 किलो ग्रॅम सोनं खरेदी करू शकतात
> या गोल्ड बॉन्डची विक्री बँक, पोस्ट ऑफिस आणि शेअर बाजारद्वारे होईल.

सॉवरेन गोल्ड बॉन्डबद्दल खास माहिती
सॉवरेन गोल्ड बॉन्ड भारत सरकारच्या वतीने RBI इश्यू करते. या बॉन्डमध्ये तुम्ही आठ वर्षे गुंतवणूक करू शकता. त्यानंतर पाचव्या वर्षापासून या योजनेतून व्याज भरण्याच्या तारखेपासून माघार घेण्याचा पर्याय दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments