कारण

CM Thackeray Live: उद्यापासून काही दिवस राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी

“कोरोना” नावाच्या महाभयानक विषाणूमुळे गेला वर्षभर संपूर्ण जगालाच लॉकडाऊन व्हायला लागले होते. या महामारीच्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली आणि जग अनलॉक व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्रही सावध पवित्रा घेत टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागला. गेले काही महिने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळत होते.

मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातीलंच एक निर्णय म्हणजे उद्यापासून काही दिवस राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे.

“उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणूका, मोर्चे, गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या यात्रा यांना आपण पुन्हा एकदा काही दिवसांसाठी राज्यात बंदी करत आहोत.” अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना काळातील नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक कार्यक्रम आणि लग्न समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments