खूप काही

पूजा चव्हाण गर्भपात आणि आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड याला अटक

पुणे- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गायब असलेला अरुण राठोड ह्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत त्याला ताब्यात घेतल.या प्रकरणात त्याची चौकशी थेट आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.

मुळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील हडपसरमध्ये राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला होता जेव्हा पूजा अरुण राठोडच्या नावाने यवतमाळच्या रूग्णालयात गर्भपात झाल्याची बातमी समोर आली होती.त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण ? असा प्रश्न उभा राहिला होता.

चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्या नक्की अरुण राठोडच्या आहेत का याचा खुलासा झाला नव्हता पण त्या क्लिप मध्ये प्रकरण दाबण्याचा गोष्टी होत होत्या. प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments