कारण

पुजा चव्हाण तर भाजपसाठी काम करायची; वडिलांनी केला मोठा गौप्यस्फोट

पूजा चव्हाण या 22 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आघाडी सरकारवर विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. या कथित आत्महत्या प्रकरणात राज्यातील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (Pooja Chavan Suside Case take New Angle)

एकीकडे आघाडी सरकार यावर सावध भूमिका घेताना दिसतय, वनमंत्री संजय राठोड गायब असल्याचं देखील चित्र आहे तर दुसरीकडे भाजप हा मुद्दा उचलून आक्रमकतेच्या भूमिकेत सरकारवर घणाघाती टीका करत आहे. हे सगळं असताना आता पूजा हिच्या वडिलांनी मात्र अनेक गंभीर गौप्यस्फोट केले आहेत. एका मुलाखतीत पूजा हिच्या वडिलांनी “पूजा ही 3 वर्षे भाजपा कार्यकर्ता होती” असे व्यक्तव्य केले आहे. (Pooja was working with BJP for 3 Year)

पूजा हिने पोल्ट्री फार्मसाठी कर्ज घेतल होतं, यामध्ये तिचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, या गोष्टीचा पुजावर खूप ताण होता. आता इथे काही होणार नाही म्हणून पुण्याला जाऊन दुसरं काहीतरी करते अस पूजा म्हणाली असल्याचं पुढे तिचे वडील सांगतात. शिवाय आत्महत्या झाल्याच्या दिवशी दुपारी जवळपास2 च्या सुमारास माझं तिच्या बोलणं झालं होतं, पैसे वगैरे हवे आहेत का असंही मी विचारलं होत, त्यावर ती नको असं उत्तरल, असे पूजाचे वडील सांगतात.

पूजा आत्महत्या प्रकरणात आता वनमंत्री राठोड यांच्यासोबत अनेकांची नावे जोडली गेली आहेत. त्यावर तिचे वडील “हे सगळं चुकीचं आहे, तपास सुरू आहे त्यामधून सत्य बाहेर येईल आणि मग मंत्री असो वा आणखी कुणी त्यांना जरूर शिक्षा झाली पाहिजे. पण तोपर्यंत विनाकारण कुणाची बदनामी नको” असे ते म्हणतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments