फेमस

आपलं नाक वेगळं दिसण्याबद्दल प्रियांका चोप्राने एक खुलासा केला आहे.

प्रियंका चोप्रा हिने तिच नाक तिच्या विशी मध्ये अचानक वेगळ का दिसायला लागल यावर खुलासा केला आहे. तिने तिच्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकात तिच्या सर्जरी बद्दल सांगितल आहे. तिला ‘प्लास्टिक चोप्रा’ अस नाव देण्यात आल होत.

प्रियंका चोप्राने जेव्हा तिच्या नाकाची सर्जरी केली होती तेव्हा ती चर्चेचा विषय बनली होती.तिला “प्लास्टिक चोप्रा” अस नाव ठेवण्यात आल होत. तिने याबद्दल सविस्तर सांगितल आहे.तिला श्र्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर कळल की तिच्या नेजल केविटी मध्ये “पॉलीप” होता.

प्रियंकाने सांगीतल की “माझ्या कुटुंबाने दिलेल्या सल्ल्यानुसार मी जेव्हा माझ्या डॉक्टरकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितले की माझ्या नाकामध्ये असलेली पोकळी मला काढून घ्यावी लागेल. सर्जरी तेवढीच होती पण माझ्या वेळेस फक्त इतकंच नाही झालं. माझ्या सर्जरीच्या वेळेस पोकळी काढताना डॉक्टरांकडून चुकून माझ्या नाकाच पूल तुटल ज्यामुळे माझ नाकच बिगडल.जेव्हा ते मी आणि माझ्या आईने बगीतल तेव्हा आम्ही दोघी घाबरलो.माझ्या नाकाच्या रूपातच बदल झाला होता.”

तिने सांगितल की तेव्हा तिला इंडस्ट्री मध्ये टिकून राहण्यासाठी आणि काम मिळाव यासाठी तिने ही सर्जरी केली जी तेव्हा बिघडली होती, इतकी की ती स्वतःचा चेहरा आरशात बघू शकत नव्हती. “ते नीट करण्यासाठी मला अनेक सर्जरी कराव्या लागल्या. हळू हळू नाकाचा आकार पण नीट झाला आणि मला माझा आत्मविश्वास परत मिळाला.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments