खूप काही

भारतीय महिलेने फडकवला नासामध्ये झेंडा, थेट जगाच्या शक्तीशाली कंपनीच्या प्रमुखपदी.

भरतीय – अमेरिकन वंशाच्या भव्या लाल यांनी नासामधील कार्यकारी प्रमुख हे मानाचे पद मिळवून भारताचे नाव संपूर्ण जगासमोर उंचावले आहे.भव्या लाल यांनी परमाणू विज्ञानमध्ये बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्सची डिग्री मिळवली आहे, मैसाचूसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीमधून टेकनॉलॉजी अँड पॉलिसीची, मास्टर ऑफ सायन्सची डिग्री मिळवली आहे.

भव्या लाल यांची सोमवारी NASA ने अंतरीक्ष एजेंसीच्या कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बाईडन यांनी भव्या लाल यांना NASA मधील बदलाव संबंधातील समीक्षा दलाचे सदस्य बनवले आहे आणि बाईडन प्रशासनाच्या अधिपत्या खालील एजेंसीमधील परिवर्तन संबंधी कार्याची त्या देखरेख करत आहेत.

NASA नेसुद्धा त्यांच्या एका भाषणातून भव्या लाल यांना इंजिनीरिंग आणि अंतरिक्ष प्रौद्योगिकी क्षेत्राचा चांगला अनुभव असल्याचे नमूद केले आहे.भव्या पाच उच्च प्रभावशाली नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स समित्यांच्या अध्यक्षा आणि सहअध्यक्षा राहिल्या आहेत.या व्यतिरिक्त भव्या या NASA मधील इंनोवाटिव्ह ऍडव्हान्स कन्सेप्ट प्रोग्रॅम आणि NASA अड्वाइजरी काउंसिलच्या एक्सटेर्नल सदस्यदेखील राहिल्या आहेत.

भव्या लाल यांची कामगिरी
भव्या लाल 2005 पासून 2020 पर्यंत इन्स्टिटयूट फॉर डिफेन्स एनालिसिस सायन्स एन्ड टेकनॉलॉजी पोलीसी इन्स्टिटयूट (STPI) मध्ये रिसर्च स्टाफच्या सदस्य होत्या.
(STPI) मध्ये कार्यरत होण्यापूर्वी भव्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी नीती अनुसंधान आणि परामर्श फर्म (C-STPS LLC) च्या अध्यक्षा होत्या. याआधी केम्ब्रिजच्या मैसाचुसेट्समधील एक वैश्विक नीती अनुसंधान परामर्श असोसिएट्स मध्ये विज्ञान आणि प्रौद्योगिक नीती अध्ययन केंद्रच्या डायरेक्टर होत्या. त्या न्युकलेअरवर अमेरिकन न्युकलेअर सोसायटीच्या वार्षिक संमेलनातसह अध्यक्षसुद्धा होत्या

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments