फेमस

अभिमानास्पद; तेंडुलकर ड्राईव्ह आणि कोहली क्रेसेंट नावाने ऑस्ट्रेलियात रस्ते

भारतीय संघातील मुंबईचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि पंजाबमधील भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या चाहत्यांची रांग देशविदेशात पहायला मिळते. आपल्या विशिष्ट खेळीमुळे देशाविदेशात त्यांनी लाखो चाहते निर्माण केले आहे. भारतातील अनेक मानांचे हकदार हे दोन क्रिकेटपटू देशविदेशात देखील गौरविले जातात. भारतातील क्रिकेट हा खेळ जरी भारतीय खेळ नसला तरी त्याची छाप इतर खेळांपेक्षा अधिक आहे. आणि क्रिकेट पटूंबद्दल बोलायच झालं तर इथे अभिनेते अभिनेत्रींपेक्षा जास्त फेम ही क्रिकेटपटूंची असते. अशीच फेम या दोन क्रिकेटपटूंची ऑस्ट्रेलियात पहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात चक्क रस्त्याला या दोन खेळाडूंची नावे दिली आहेत. (Roads in Australia called Tendulkar Drive and Kohli Crescent)

होय, भारतीयांना अभिमान वाटेल अशी ही बाब आहे. ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया उपनगरातील इस्टेट डेव्हलपर्स शहरातील एका रस्त्याला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावाने म्हणजेच तेंडुलकर ड्राईव्ह आणि कोहली क्रेसेंट अशी नावे देण्यात आली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटरच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवण्याचा हा नवीन प्रयत्न चांगलाच चर्चेत येतोय.

आता आपल्या भारतीय क्रिकेटपटूच्या नावावरून रस्त्याचे नाव ठेवण्याची ही पहिली वेळ नाही. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे सुनील गावस्कर – ‘गावस्कर प्लेस’ या नावाने एक रस्ता आहे. हे खंडाळा नावाच्या ठिकाणी वसलेले आहे. यावरून भारतात जसे आपल्या क्रिकेटपटूंना मान दिला जातो तसाच इतर देशात देखील मिळतो हे यावरून लक्षात येते.

ऑस्ट्रेलियातील या शहरातील अनेक रस्त्यांना क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत. जसे की, वॉ स्ट्रीट (माजी ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह वॉ), सोबर्स ड्राईव्ह (वेस्ट इंडीजचा महान सर गॅरी सोबर्स), कॅलिस वे (दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॅक कॅलिस) देव टेरेस (भारताचे माजी कर्णधार कपिल देव), हॅडली स्ट्रीट (न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सर रिचर्ड जॉन हॅडली), अक्रम वे (पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम) अशी नावे त्या रस्त्यांना दिली गेली आहेत. पण भारतातील आपल्या क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात अशी मनाची संधी मिळाली ही एक गर्वाची बाब आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघ आणि भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानात नेहमी विरोधात खेळताना पाहायला मिळाला. नेहमीच हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान इतकाच आकर्षित आणि मनोरंजक झाला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments