कारण

हिंदुस्थानची पवित्र जमीन नरेंद्र मोदींनी चीनला दिली; राहुल गांधी यांचा आरोप

संसदेत राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर भारताची पवित्र जमीन चीनला दिल्याचा आरोप केला आहे सोबतच त्यांना खडेबोल सुनावून पुरेपूर तोंड सुखही  घेतलं आहे. 

चीनी सैन्य का मागे हटले नाही ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पत्रकार सभेत मांडला. मोदींनी चीन समोर डोकं टेकवल आहे. असं ही राहुल गांधी सभे दरम्यान म्हणाले. आपली जमीन फिंगर 4 पर्यंत आहे. नरेंद्र मोदींनी फिंगर 3 पासून ते फिंगर 4 पर्यंतची भारताची जमीन चिनी ला दिली आहे. संरक्षण मंत्री फक्त बसून होते डेपसांग, पेंगोंग, गोग्रा आणि होट स्प्रिंग या भारतीय भूभागां बद्दल ते काहीच बोलले नाहीत. खर हेच आहे की मोदींनी चीन ला भारताची पवित्र जमीन देऊन टाकली आहे. हा प्रश्न असून याच उत्तर द्या असं राहुल गांधी सभेत म्हणले. 

 सैनिकांनी त्यांच्या जवळील सर्व काही पणाला लावून कैलास जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता प्रधानमंत्री जमीन परत करत आहेत. कैलास परत केला जात आहे.हा 100% भ्याड पणा आहे. पंतप्रधान चीन समोर उभे राहू शकत नाहीत. असा टोला ही राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. सोबतच काल केलेली घोषणा स्वतः मोदींनी का नाही केली असा सवाल सुद्धा राहुल यांनी विचारला. 

सभेदरम्यान पत्रकारांनी राहुल गांधी याना मोदींवर केलेल्या या आरोपांचे कारण विचारले असता, “ चीन समोर नरेंद्र मोदी उभे नाही राहू शकले, चीन समोर आपले सैन्य उभे आहे, वायुदल सज्ज आहे, नौकादल ही तयार आहे पण प्रधान मंत्री तयार नाहीत. हेच कारण आहे.” असं उत्तर राहुल गांधींनी दिल.  

पूर्ण सभेत राहुल गांधींनी मोदींना भ्याड सिद्ध करण्याची एकही संधी सोडली नाही. आणि पुरेपूर तोंडसुख अनुभवलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments