कारण

मला त्यांच्याविषयी राग किंवा द्वेष नाही; वडिल राजीव यांच्या मारेकऱ्यांविषयी राहुल गांधींचे वक्तव्य

चेन्नई येथे 21 मे 1991 रोजी एका निवडणूकीच्या रॅलीमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यावर एका महिला सुसाईड बॉम्बरने हल्ला केला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

पाँडीचेरी येथील भारतीदासन गवर्नमेंट कॉलेज फॉर वुमन (Bharathidasan Government College for Women) या ठिकाणी राजीव यांचे सुपुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) तेथील विद्यार्थ्याशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना एका विद्यार्थीनीने एक प्रश्र विचारला की, “तुमच्या वडिलांना लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (LTTE) यांनी मारले होते. तर या लोकांविषयी तुमच्या काय भावना आहेत?”

या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सभागृहात टाळ्यांची गडगडाट झाला. राहुल उत्तर देताना म्हणाले, “मला माझ्या वडलांच्या मृत्यूमळे खूप मोठा धक्का बसला होता. मी माझे वडिल गमावले आणि तो काळ माझ्यासाठी फार कठीण होता. पण आता माझ्या मनात त्यांच्या मारेकऱ्यांविषयी राग किंवा द्वेष नाही आहे. मी त्यांना माफ केले आहे.”

राहूल यांना आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडिलांना गमावल्यानंतर त्यांच्या राजकीय कारर्किदीविषयी प्रश्र विचारण्यात आला. त्याला राहुल यांनी उत्तर दिले, “हिंसा तुमच्यापासून काहीही घेऊन जाऊ शकत नाही. माझे वडिल आजही माझ्यात जिवंत आहेत. माझे वडील माझ्याद्वारे बोलत आहेत.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments