कारण

Raj Thackeray: इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनसेचा मास्टर प्लॅन; कल्याण-डोंबिवलीची जबाबदारी या तीन नेत्यांवर….

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या दोन नेत्यांनी मनसेला रामराम ठोकला. यामुळे मनसेचे इंजिन पुन्हा एकदा रुळावरून घसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मनसेचे इंजिन पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची जबाबदारीसोपवण्यात आली आहे.

याआधी झालेल्या निवडणुकीतही 2014 आणि 2015 कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेला पराभव स्विकारावा लागला होता. त्यातच आता डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला बसलेले हे धक्के लक्षात घेता निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन आखला जात आहे.

(Raj Thackeray: MNS master plan to get the engine back on track; The responsibility of Kalyan-Dombivali falls on these three leaders….)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments