कारणखूप काही

Farmers Protest: रिहाना आणि ग्रेटा थनबर्गच्या वक्तव्यांवर राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे 70 दिवासाहून अधिक काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक गट विरोध करतोय तर दुसरा गट पाठिंबा देत आहे. दोन दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग सह काही विदेशी मंडळींनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिलाय. त्यावरून देशात सध्या काय चालू आहे ते आपणास ठाऊक आहेच.

शेतकरी आंदोलनाला सर्वच स्तरांतून आता वाढता पाठिंबा मिळत आहे. याविषयी माध्यमांसोबत संवाद साधताना भारतीय किसान यूनियन (BKU) चे नेते राकेश टिकैत यांनी पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग सह ज्या मंडळींनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे त्यांचे स्वागत केले आहे.

राकेश टिकैत यांनी विदेशातून मिळणार्या पाठिंब्यावर यावेळी भाष्या केले. “जर विदेशातून आमच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत असेल तर त्यात काय अडचण आहे. ते आमच्यासोबत कशाची लेन-देन करत नाही आहेत” असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, हे शेतकरी आंदोलन गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या तीन कृषी कायदे स्थगित केले आहेत. मात्र शेतकरी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असून जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments