फेमस

बिग बॉस14 फेम राखी सावंत जातेय या कठीण प्रसंगातून…

बिग बॉस 14  स्पर्धक  बेधडक, बिन्धास्थ  राखी सावंत तीच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे . बिग बॉस 14 सुद्धा तीने तिच्या याच हटके अंदाजाने गाजवलं. परंतु हीच बेफाम राखी सावंत सध्या एका खूप कठीण परिस्थितीला तोंड देत आहे. राखी च्या आईला कॅन्सर या भयंकर आजाराने ग्रासले आहे. 

नुकतच राखी सावंत ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिच्या आईचा उपचारा दरम्यान चा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तीने तिच्या आईवर कॅन्सर वरील उपचार चालू असून तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. 

त्यानंतर राखीने तिच्या आईसोबतचा हॉस्पिटल मधला एक विडिओ शेअर केला ज्यात राखी आणि तिची आई सलमान खानचे आभार मानताना दिसत आहेत. बिग बॉस 14 मध्ये जेव्हा राखी खेळात होती तेव्हा तिला अनेक प्रकारे सलमान खान ने मदत केल्याचे राखीने एका प्रेस कॉन्फरेन्स मधे सांगितले. त्यांनतर या कठीण प्रसंगात सुद्धा सलमान ने राखी आणि तिच्या आईची मदत केली. 

या विडिओ मध्ये राखी आणि तिची आई सलमान खानला , ‘ थँक यु सलमानजी , देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, देव तुमच्या सोबतच आहे .’ असे आशीर्वाद दिले. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments