खूप काही

अश्विन ठरला ‘हा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिला गोलंदाज

चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा ऑफ स्पिनर आर अश्विनने आपल्या नावे एका नव्या आणि खास विक्रमाची नोंद केली आहे. अश्विनने कसोटी सामन्यांमध्ये 200 वेळा डाव्या हाताच्या फलंदाजाला बाद करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे अश्विन ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील आजच्या दिवशी अश्विनने स्टुअर्ट ब्रॉडला बाद करत हा विक्रम आपल्या नावे केला.

अश्विन डाव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना खूप त्रास देत आला आहे. अश्विनने डेव्हिड वॉर्नरला 10 वेळा, ॲलिस्टर कूक आणि बेन स्टोक्स या दोघांना प्रत्येकी 9 वेळा बाद केले आहे. तसेच एड कोवान आणि जेम्स अँडरसन यांना प्रत्येकी 7 वेळा त्याने बाद केले आहे.

हरभजन सिंहला टाकले मागे

दरम्यान अश्विनने भारतात सर्वात जास्त विकेट घेत हरभजन सिंहला मागे टाकले आहे. अश्विनच्या नावावर आता भारतात 45 कसोटी सामन्यांमध्ये 268 विकेट मिळवल्या आहेत. हरभजन सिंहने 55 सामन्यांमध्ये 265 विकेट मिळवल्या होत्या, त्यामुळे आता तो क्रमांक तीनवर आला आहे. तसेच अनिल कुंबळेच्या नावे 63 सामन्यांमध्ये 350 विकेट घेतल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments