कारण

काँग्रेसच्या राजकारणावर टीका करण्यासाठी मोदींनी सांगितलेला हा अफलातून किस्सा वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज चोहोबाजूनं टिका केली. काँग्रेसच्या मानसिकतेवर आणि आहे तशीच स्थिती ठेवण्याच्या मानसिकतेवर टिका करताना मोदींनी तामिळनाडुतला एक किस्सा लोकसभेत सांगितला. आम्ही बदल घडवण्यासाठी आलोत आणि त्यासाठी प्रयत्न करणारच. साचलेलं पाणी रोगराई आणतं आणि वहातं पाणी जीवन फुलवतं असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत.

काय आहे मोदींनी सांगितलेला तामिळनाडुतला किस्सा?
तामिळनाडुत साठच्या दशकात राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यावर विचार करण्यासाठी एक कमिशन बसवलेलं होतं. त्या कमिशनच्या चेअरमनकडे एक लिफापा आला. त्यावर टॉप सिक्रेट असं लिहिलेलं होतं. त्यात एक अर्ज होता. अर्ज करणाऱ्यानं मागणी केली होती की, माझा पगार वाढवला जावा. मी खुप वर्षापासून काम करतोय. इमानदारीनं करतो आहे. चेअरमननं त्या अर्जदाराला परत लिहिलं की, तुम्ही आहात कोण, काय करता? अर्जदारानं उत्तर पाठवलं, मी सीसीएच्या पदावर काम करतो. मुख्य सचिवांच्या बाजुला बसतो.

चेअरमनला आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा विचारलं, हे सीसीए आहे काय? आम्हाला तर काहीच माहित नाही. अर्जदारानं सांगितलं मी 1975 पर्यंत हे मी सांगू शकत नाही. मग चेअरमननं सांगितलं, मग तु माझं डोकं कशाला खातोय, जे कमिशन 1975 नंतर येईन, त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी कर. अर्जदाराला वाटलं, हे तर बिघडलं सगळं. त्यानं चेअरमनला पुन्हा उत्तर लिहिलं आणि सांगितलं सीसीएचा अर्थ आहे, चर्चिलस् सिगार असिस्टंट. हे माझं पद आहे आणि या पदावर मी काम करतो.

1940 मध्ये विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्यांना त्रिचीहुन सिगारेट जात होती. सीसीएचं काम होतं की, ती सिगारेट पोहोचली की नाही ते पहाणं. 1945 चर्चिल निवडणूक हरले. पण ते पद तसच राहीलं. सिगारेटचा सप्लायही कायम राहीला. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरही ते पद कायम राहीलं. त्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं स्वत:च्या पगारवाढीची मागणी केली होती. जर आहे ती स्थिती बदलली नाही तर काय चालू असतं त्याचं हे उदाहरण.

(Read this amazing story told by Modi to criticize the politics of the Congress …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments