कारण

शिवसेना संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही कारण..

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. भाजपने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यातील एक आवाज हा राठोड यांचा आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वाघ यांनी केली.

संजय राठोड गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. ते कुठे आहेत हे कुणालाही माहिती नाही. अशातच, आज संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र असे काही घडले नसल्याचे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितले आहे.

परंतू, यामुळे एक प्रश्र नक्कीच पडतो की शिवसेना संजय राठोड यांचा राजीनामा का घेत नाही? जरी राठोडांनी आज राजीनामा दिलेला असला तरी तो पक्षश्रेष्ठींनी स्विकारला आहे का?

शिवसेना राठोडांचा राजीनामा घेत नाही कारण..

संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तसे पहायला गेले तर विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद कमी आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यामुळे विदर्भात शिवसेना टिकून आहे. राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे एकमेव आमदार आहेत. अशापरिस्थितीत जर शिवसेनेने त्यांचा राजीनामा स्विकारला तर बंजारांच्या मनात नाराजीचे वातावरण निर्माण होईल. हेच शिवसेनेला टाळायचे आहे.

त्यामुळे, जर शिवसेनेने राठोड यांच्यावर कारवाई केली तर बंजारा समाजात सेनेप्रती नाराजी निर्माण होईल आणि याचे परिणाम सेनेला पुढील काळात भोगायला लागू शकतात. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments