खूप काही

बजेटच्या आधीच सरकारसाठी आनंदाची बातमी, भारतीयांच्या फायद्याची गोष्ट

अर्थमंत्री निर्मला सितारमण 2021-22 चे बजेट सादर करत आहेत. त्याआधी सरकारसाठी एक दिलसायक बातमी आली आहे. जानेवारीमध्ये जीएसटी (January GST Collection) कलेक्शनच्या रेकॉर्डमध्ये वाढ झाली आहे.

जानेवारीमध्ये जीएसटी 1.20 लाख करोड इतका जमा झाल्याची माहिती विक्त मंत्रालयाने दिली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 5 महिन्यांतील जीएसटी महसूल वसुली पूर्ण होत आहे. जानेवारीमध्ये जीएसटीचे कलेक्शन वर्षभरापूर्वीच्या कलेक्शनपेक्षा 8% ज्यादा आहे.

वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘जानेवारी 2021 मध्ये 31 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीएसटी राजस्व संग्रह 1,19,847 करोड रूपये राहिला आहे. यात केंद्रीय जीएसटी 21,923 करोड रूपये, राज्याचं जीएसटी 29,014 करोड रुपये, एकिकृत जीएसटी 60,288 करोड रूपये, ( सामानाच्या आयातीचे प्राप्त 27,424 करोड रुपये) आणि गुड्स 622 कोटी रुपये जमा झाला आहे. 

जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा जास्त असण्याची शक्यताही वित्त मंत्रालयाने वर्तीवली आहे.

जीएसटी फसवणुकीच्या घटनेमुळे कलेक्शन वाढला

जीएसटी कलेक्शन वाढल्यामुळे सरकारच्या सूत्रांनुसार मागच्या काही दिवसांत विभागाकडून बजेटमध्ये होणाऱ्या फ्रॉडमध्ये सखतीने नजर ठेवली गेली, त्यामुळे रिटर्न फाईलिंगमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2020 पासून आत्तापर्यंत 274 नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याचंही वित्त1मंत्रालयाने सांगितलं आहे.

8500 बोगस कंपन्यांच्या विरोधात 2700 गुन्हे दाखल केले आहेत. ह्या कारवाईमुळे सरकारकडे 858 करोड रुपये आले असल्याचीही माहिती समोर आली आहे. कंपनी सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करतात, ज्यामुळे व्यापार आणि कलेक्शनमध्ये वाढ होते.

जीएसटी संकलनाची आकडेवारी पाहिल्यास, 2020-21 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानच्या सरासरी संग्रहात 24% घट झाली आहे. दुसऱ्या 6 महिन्यात यात 8% वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये इम्पोर्ट गुड्स रेव्हेन्यूमध्ये 16% वाढ झाली आहे आणि डोमेस्टिक ट्रांजैक्शन रेव्हेन्यूमध्ये 8% वाढ झाली आहे, ही देशाच्या फायद्याची गोष्ट असल्याचंही म्हटलं जातय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments