कारणखूप काही

15 फेब्रुवारी 2021 पासून सुरु होणार महाविद्यालय ! पण या निर्णयावर काय आहे विद्यार्थ्यांचं मत ?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल 15 फेब्रुवारी 2021 पासून राज्यातील सर्व महाविद्यालय पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या वर्षभरापासून बंद झालेली महाविद्यालय पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाने विद्यार्थी वर्गात एक वेगळीच खळबळ सुरु झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी या निर्णयाने संभवणाऱ्या समस्या मांडल्या, काहींनी तर भलत्याच गोष्टींची मागणी सुद्धा केली.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2021 पासून चालू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना 50% पर्यंत रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश असेल. असं परिपत्रक काल जारी करण्यात आले आणि सोशल मीडिया वर विद्यार्थ्यांच्या पोस्ट, कंमेंट्स चा पाऊस पडला.

बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा उदय सामंतांच्या ट्विटर अकाउंट वर कंमेंट्सच्या स्वरूपात मांडल्या.
ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की, तुमच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतु, सर्व लेक्चर्स ऑनलाईन झाल्याने आणि वेळ कमी असल्याने आता परीक्षाही ऑनलाईन घ्याव्यात.


काहींनी प्रॅक्टिकल एक्साम्स रद्द कराव्यात अशीही मागणी केली. काही विद्यार्थ्यां मध्ये अजूनही कोव्हीड ची भीती दिसून आली.

तर, काहींनी प्रवास दरम्यान होणाऱ्या गैरसोयींची तक्रार केली.
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सुद्धा चालूकरण्याची मागणी केली आहे.

काहींनी तर, चक्क शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करता यावी म्हणून 19 फेब्रुवारी नंतरच मदविद्यालय सुरु करण्याची विनंती केली.

कोरोना काळात घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पुन्हा सुरु झाल्यांनतर नवीन परिस्थितीशी जुळून घेताना थोडी फार तारेवरची कसरत करावीच लागणार. परंतु लवकरच सर्वकाही सुरळीत होईल ही अशा ठेऊन आपण ह्या निर्णयाचे स्वागत करूयात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments