आपलं शहर

मुंबईत रिक्षा-टॅक्सीतून प्रवास करताना आता मोजावे लागणार अधिक रुपये..

गेले अनेक दिवस भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलेच चटके दिले आहेत. अशावेळी सर्वसामान्य जनता रिक्षा आणि टॅक्सी या वाहनांनी प्रवास करत आहे. मात्र या प्रवासासाठीही आता मुंबईकरांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. त्यामुळेच आता मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी लवकरंच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात किमान 3 रुपयांची वाढ करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सीसाठी आता 22 ऐवजी 25 रुपये तर रिक्षा प्रवासासाठी 18 ऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, ही भाडेवाढ मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments