खूप काही

Covid-19: पुण्यात पुन्हा कोरोना संख्यांमध्ये वाढ, रात्री 11 नंतर संचारबंदी

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे प्रशासनानं कठोर पाऊल उचललं. पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान संचारबंदी जाहिर केली आहे. हॉटेल आणि इतर ठिकाण ज्यांना रात्री चालू असण्याची परवानगी दिली होती तीही रद्द केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला तेव्हा हे निर्णय घेण्यात आले.रात्री ११नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या लायब्ररींमध्ये 50% क्षमतेची परवानगी देण्यात आलेली आहे.

लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आणण्यात आले आहेत. कार्यक्रमांसाठी 200 जणांना परवानगी तसच पोलिसांची परवानगीही घ्यावी लागणार आहे.जिल्ह्यांतर्गंत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाही. भाजीपाला आणि अन्य वस्तू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात सोमवारी व्यापारी वर्गासोबत बैठक घेण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments