खूप काही

पुण्यातील ‘या’ हॉटेलमधले भन्नाट नियम पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल…

पुण्याचा विषय आला की आपल्याला आठवतो तो म्हणजे पुण्याचा इतिहास, तिथली पर्यटनस्थळं, तिथलं खाणं, पुणेरी पाट्या इत्यादी. पुणेरी पाट्यांनी तर आपल्यातील प्रत्येकाला कितीतरी वेळा खळखळून हसण्यास भाग पाडलंय. अशीच एका हॉटेलमधील नियमांची यादी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

एका व्यक्तिने पुण्यातील एका इराणी कॅफेमधला मेन्यूचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. त्यात ग्राहकांनी या हॉटेलमध्ये असताना काय ‘नाही’ करायचं याची नियमावली होती.

या यादीची सुरूवात होते ‘लॅपटॉप चालणार नाही’ यावरून आणि ‘फुकटचे सल्ले देऊ नये’ यावर समाप्त होते! याशिवाय “मोबाईल गेम खेळू नये, ‘No bargaining’ म्हणजे भाव करू नये, केस विंचरू नये, दात घासू नये” असेही नियम आहेत. दरम्यान या यादीमध्ये जवळपास असे 19 नियम आहेत.

या पोस्टला सोशल मिडियावर खूप छान प्रतिसाद मिळत आहे. काहींनी तर या इराणी कॅफेतील आपले अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments