फेमस

मोदी नाही, शेतकरी महिला ठरतेय देशाचा आदर्श, कर्तबगारी एकदम महान

दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कासाठी हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत, कृषी कायद्याविरोधात देशभरात रान पेटल आहे, अस असलं तरी आपला अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतीधर्म जपला आहे. एका महिलेने देशातील हजारो शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. (Saffron cultivation by women of Jharkhand)

केसरचं उत्पादन फक्त काश्मीरमध्ये होतं, असा आपला आतापर्यंतचा समज होता, मात्र हा समजलं झारखंडमधल्या शेतकरी महिलेने दूर केला आहे.

झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केसरची शेती केली जात आहे. जिल्ह्यातील सिमरिया भागातील चलकी आणि सेरंगदाग गावांमध्ये कसरचे उत्पादन जास्त घेतले जात आहे. याच गावात राहणाऱ्या सरिता देवी यांनी केसरचे नवे प्रयोग करत, आपलं नाव देशपातळीवर पोहचवले  आहे. सरितादेवीसारख्या अनेक महिला आज केसरच्या उपदानावर मोठं पीक घेत आहेत.

सरिता देवींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला मदत करायची आहे, त्यामुळे या विकासाला एकूण चालना मिळेल असं, सरिता देवी सांगतात. सध्या केसरच्या शेतीबद्दल सरिता देवींसारख्या अनेक महिलांना तिथली जीएसएलपीएस ही संस्था प्रशिक्षण देते.

या महिलांनी 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात केसरची लागवड केली होती. सहा ते सात महिन्यात आलेलं केसर त्यांच्याशी फायदेशील ठरलं आहे. सुरुवातीला कर्ज घेऊन महिलांनी केसरच बियाणे विकत घेतले. त्यानंतर त्याची लागवड केली. सध्या 30 हजार कर्ज घेऊन केसरची शेती करत आहोत, उत्पन्न विकल्यानंतर घेतलेल्या कर्जाची परतफेड करू, अशी माहिती सरिता देवीच्या साथीदार राजकुमारी देवी यांनी दिली. (Saffron is widely cultivated in Chatra district of Jharkhand)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments