फेमस

सलमान खानने पहिल्यांदाच व्यक्त केल शेतकरी आंदोलनाबद्दल आपलं मत

रिऍलिटी शोच्या लाँचच्या वेळीस सलमान खानने पहिल्यांदाच शेतकरी आंदोलना बद्दलचे आपले मत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे.

गुरुवारी झालेल्या इंडियन प्रो मुसिक लीग च्या लाँचच्या वेळी सलमान खानने आपली उपस्थिती दर्शवली. त्याच्या येण्याने सोहळ्यला चार चांद लागले. पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने सलमानला देशात होत असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय मुद्दा बनलेल्या शेतकरी आंदोलना बद्दल तुमच काय मत आहे असा प्रश्न केला. भारतातील प्रत्येक नागरिकाला या घटने बद्दल माहित असणं आणि त्याबाबतीत काहींना काही मत असणं गरजेच आहे. अशातच एका सुपरस्टार च याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यात सर्वनांच उत्सुकता असते.

बऱ्याचदा अनेक अभिनेता अभिनेत्री अशा विषयांवर बोलायला, मत मांडायला घाबरतात. परंतु चालू लाँच शो मध्ये सर्व प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत कोणत्याही प्रश्नच उत्तर देणं हे प्रत्येक अभिनेत्याला भागच असत.
दबंग सलमान खानला जेव्हा शेतकरी आंदोलन बद्दल मत विचारलं तेव्हा त्याने , “ जे योग्य आहे तेच व्हावं, जे पूर्णपणे बरोबर आहे तेच व्हावं, जे पूर्णतः आदर्श असेल तेच व्हावं .” असं उत्तर दिल. या उत्तराने तो नक्की कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होत नसल तरीही प्रश्नाचं उत्तर देऊन सलमानने पत्रकारांकडून आपली सुटका करून घेतली.

या आधी कधीच सलमान खानने आंदोलना बद्दल आपले कोणतेही मत सोशल मीडिया अकाउंट वर मांडले नव्हते.
एवढाच काय तर आत्तापर्यंत शारुख खान, सैफ अली खान, अमीर खान यांनीही या मुद्यावर मौनच धरलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments