खूप काही

पुरातत्व विभागावर खासदार संभाजीराजे छत्रपती भडकले…

आज 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. यानिमित्ताने किल्ले रायगडवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार पुरातत्व विभागाकडून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने डिस्को लाईटचा वापर केल्याने खासदार संभाजीराजे संतापले आहेत. एक ट्विट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजन केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाच्या या कृत्यावर टिका केली आहे.

त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाशयोजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो, अशा आक्रमक शब्दांत खासदार संभाजीराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments