कारण

विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार, मनसेचा बीएमसीच्या सत्ताधाऱ्यांना टोला

आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला निशाण्यावर धरले होते. 

विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार हे ट्विट शिवसेनेलं  झोंबले असल्याचे ही त्यांनी सांगितले. संदीप देशपांडे यांनी, मी आज पुरावे घेऊन आलोय की विरप्पन गॅंग कशी खंडणी वसूल करते, असं बोलून शिवसेनेकडून फेरीवाल्यांना  देण्यात आलेल्या पावत्या आजच्या पत्रकार परिषदेत मांडल्या.  

शिकसेने ने हॉकर्स झोन ची घोषणा केली होत परंतु झोन झाले नाहीत. आणि आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देऊन खंडणी गोळा करत असल्याचे त्यांनी या परिषदेत सांगितले.  या पावत्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. या पावत्यांवर सार्वजनिक पाथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा  होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणार आकार… असं लिहिलं असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. 

 पत्रकार परिषदे दरम्यान बाळासाहेबांचा फोटो पावतीवर असल्याचे सांगताना संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले.  देशपांडे म्हणले, “ फेरीवाल्यांना स्पष्टपणे सांगितले जातंय तुम्ही आम्हाला पैसे द्या, महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हाथ सुद्धा लावणार नाही. पोलिसांना आम्ही म्हणजे करू. बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरणमंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जाते. मला सगळ्यात जास्त दुःख याच वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे.” 

 खंडणीखोरांवर कारवाई व्हावी आणि त्यांना चाप बसावा तसेच या गोष्टीची चौकशी उदेखील व्हावी अशी मागणी देशपांडे यांनी केली. “अशा खंडणीखोरांच्या  हातून मुंबईला वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचं राज्य मुंबई आलय की  काय? असा प्रश्न कधी कधी मला पडतो.” अशी टीका ही संदीप देशपांडे यांनी केली. सोबतच यासंबंधी तक्रार मुंबई पोलिसांना करण्याबद्दल ही  देशपांडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments