कारण

Sanjay Rathod Live: संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावर मौन सोडलं; केलं मोठं वक्तव्य..

बीड येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले होते. पूजाच्या मृत्यूनंतर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यातील एक आवाज हा राठोड यांचा आहे असा थेट आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे. तसेच त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वाघ यांनी केली होती.

या प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड नॉट रीचेबल होते. मात्र आज अखेर 15 दिवसांनी संजय राठोड सर्वांसमोर आले आहेत. राठोड यांनी बंजारा समाजाची काशी मानल्या जाणार्या पोहरादेवी गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ शेकडो समर्थकांनी गर्दी केली होती. यादरम्यान सर्वांनाच उत्सुकता होती की संजय राठोड काय बोलणार. संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी..

पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल मला दु:ख आहे. मी आणि आमचा समाज चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. मात्र पूजा चव्हाणच्या मृत्यूवरून जे घाणेरडे राजकारण केले जात आहे ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे, अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.

“राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न”

“मी ओबीसी समाजाचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. या प्रकरणातून माझे राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. माध्यमांनी जे काही दाखवले आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलिस तपास करत आहेत. त्या चौकशीतून जे समोर येईल ते बघा.” असे म्हणत राठोड यांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली.

दरम्यान, गेले पंधरा दिवस आपण कुठे होता असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना राठोड म्हणाले, “मी पंधरा दिवस नाही तर 10 दिवस आपल्यासमोर आलो नव्हतो. मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करत होतो. माझे काम थांबले नव्हते. माझ्या मुंबईतील घरून सर्व शासकीय कामे करत होतो. आज इथून दर्शन घेऊन परत कामाला सुरूवात करणार आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments