कारण

Sanjay Rathod Resignation: मी मुख्यमंत्र्यांकडे माझा राजीनामा दिलेला आहे; राजीनाम्यानंतर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा राठोड यांचाच आहे असा आरोप भाजपकडून केला गेला. तसेच मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी भाजपने केली होती.

आज अखेर संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिलेला आहे..”
“मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि तिच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून जे घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, आमच्या समाजाचा तसेच माझी वैयक्तीक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. गेले तीस वर्ष सामाजिक, राजकीय जे माझं काम होतं ते उद्ध्वस्त करण्याचे काम झालेलं आहे,” असं संजय राठोड म्हणाले.

“या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी..”
“या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे. म्हणून मी बाजूला राहून या प्रकरणाची चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे. तपास व्हावा आणि खरं सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्याना मी हे बोललो आणि माझा राजीनामासुद्धा दिलेला आहे,” असं यावेळी राठोड म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments