कारण

Sanjay Rathod: संजय राठोड यांचा राजीनामा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला सुपूर्द..

बीड येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यातील एक आवाज हा राठोड यांचा आहे असा थेट आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी भाजपची मागणी केली हाेती.

दरम्यान, आज अखेर संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड हे थोड्याच वेळापूर्वी सपत्नीक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले होते. वर्षा बंगल्यावरील या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. ही बैठक पूर्ण झाल्यानंतर राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द..

संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत आपला राजीनामा मंजूर करू नये अशी विनंती राठोड यांच्याकडून करण्यात आली होती. दुसरीकडे पोहरादेवी येथील महंतांनी देखील, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर करू नये अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात नाव आल्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम निर्णयावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर करणार का हे पाहणे आता महत्वाचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments