आपलं शहर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित?

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार, हे आता जवळपास निश्चित होत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे, असं वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती माहिती मिळत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज वेगवेगळे फोटो आणि ऑडिओ क्लिप्स बाहेर येत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे आणि राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अशावेळी सरकारच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांना राजीनामा देण्याचं सुचवलं असल्याच्या चर्चा आहेत.

दोन दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला संजय राठोडांना दीड तास वाट बघावी लागली आणि त्यानंतर ही मुख्यमंत्र्यांनी अगदी 2-4 मिनिटात संजय राठोड यांच्याशी संवाद साधून त्यांना सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार संजय राठोड यांचा राजीनामा देण्याचा निर्णय निश्चित असल्याच म्हटलं जातंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments