खूप काहीफेमस

संजन राठोड पोहरादेवी गडावर दाखल, समर्थकांची तुफान गर्दी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक दिवसांपासून “नॉट रिचेबल” असलेले संजय राठोड हे जवळपास 15 दिवसानंतर आज दुपारी पोहरादेवी गडावर दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोड ही होत्या. त्यांनी तिथे जगदंबा मातेच दर्शन घेतल. त्यांना तिथे बघायला त्यांच्या समर्थकांची तुफान गर्दी झाली होती.

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावरील संत सेवालाल महाराज मंदिरात दर्शन घेतले आहे.यानंतर ते रामराव महाराजांच्या समाधीस्थळी दाखल झाले.संजय राठोड होम हवन कडे पोहोचत आहेत,आज सकाळपासून सुरू आहे हवन.

कार्यक्रमाला 50 लोकांना परवानगी देण्यात आली होती पण त्याची फजिती झाली कारण हजारो समर्थक दाखल झाले.पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली होती.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments