कारण

संजय राऊतांच एकच उत्तर आणि अख्ख्या भाजपसह काँग्रेसही घायाळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) हे आज (7 फेब्रुवारी रोजी) कोकण दौऱ्यावर होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रीप प्रोजेक्ट समजल्या जाणाऱ्या लाईफ टाइम रुग्णालयाच्या उदघाटनासाठी अमित शाह कोकण भूमित पहिली वेळ आले होते. (Sanjay Raut’s stern reply to Amit Shah)

उदघाटनाप्रसंगी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना आपल्या भाषणातून अमित शाह यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या वेळेस जर आम्ही शिवसेनेच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेना कधीच टिकली नसती, अशी टीका अमित शाह यांनी भर सभेत केली. याच विधानाला शिवसेनेने चोख उत्तर दिलय.

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि सामना मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी अमित शाह यांना ठाकरे शैलीत उत्तर दिलय.

1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल आणि 1990 सालामध्ये मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे वक्तव्य केले होते. याबरोबरच 2012 मध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेना संपेल, असा पुनरुच्चार केला होता. मात्र, अशा प्रत्येकवेळी शिवसेना आधीपेक्षा जोमाने वाढली आहे, असं मत संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे.

या ट्विटमध्ये थेट काँग्रेसच्या नेत्यांचं नाव घेतल्याने अनेक काँग्रेस नेते घायाळ झाल्याचं म्हटलं जातंय. मविआ सरकारमध्ये काँग्रेसमध्ये दुजाभाव केला जातोय अशी आधीपासूनच भूमिका असणाऱ्या अनेक काँग्रेस नेत्यांना नाराजी व्यक्त करण्याचा मुद्दा मिळाला, असंदेखील राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय, त्यामुळे येत्या काळात कोणती राजकीय खलबते घडतात, हेच पाहणे गरजेचे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments