कारण

राजदीप सरदेसाई आणि शशी थरूर यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

प्रजासत्ताक दिनी दिल्ली सिमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. त्या रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि इंडिया टूडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई आणि अन्य काही पत्रकारांना दिलासा दिला आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू देखील झाला. याच घटनेवरून काही मंडळी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त झाली, आणि याच ट्विट केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे खासदार शशी थरूर यांच्यासहित 6 पत्रकारांविरोधात पोलिसात एफआयआर दाखल केली गेली. नोएडा, गुडगाव आणि बंगळूरू येथे ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या एफआयआर मध्ये या सात जणांवर देशद्रोह, सार्वजनिक शांततेस भंग करणे, धमकी, धार्मिक तेढ निर्माण करणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत.

काय आहे प्रकरण?
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले अडीच महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यामध्ये 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर रॅली निघाली, मात्र त्यादरम्यान दिल्लीत काही ठिकाणी हिंसाचार झाला होता. दिल्ली हायकोर्टात वकील चिरंजीव कुमार यांच्यामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये काही पत्रकारांनी आपल्या न्यूज चॅनलवर खोटी माहिती चालवली, असा आरोप कुमार यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने चिरंजीव कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी केली आणि त्यादरम्यान त्यांनी आरोप करण्यात आलेल्या व्यक्तिंच्या अटकेला तुर्तास स्थगिती दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments