खूप काही

कोरोना लस : 60 वर्षावरील नागरिकांना सरकारी केंद्रावर मोफत लसीकरण करण्यात येणार

देशभरात 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी यांचं लसीकरण पार पडलं. आता 1 मार्च पासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात होणार आहे या मध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लास देण्यात येणार आहे. 

या लसीकरण मोहिमेसाठी सरकार सज्ज झाले आहे. सरकारने दहा हजार सरकारी आणि वीस हजार खाजगी केंद्रांची सोय केली आहे. सरकारी केंद्रांवर लस मोफत देण्यात येणार असून खासगी केंद्रांवर पैसे आकारण्यात येणार आहेत. परंतु यासाठी किती पैसे आकारण्यात येतील या बाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. 

उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा करून आरोग्य मंत्रालय तीन ते चार दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या लसीकरणा दरम्यान नागरिकांना कोणत्या ठिकाणी लस घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. 

आता पर्यंत 1.21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments