आपलं शहरखूप काही

पियुष गोयल हे आमचे मित्र, मात्र… शरद पवारांनी लगावला टोला

दिल्लीत गेले 2 महिने कृषी कायद्यांविरोधात आंदोलन चालू केले. केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी नवीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं.

कृषी कायद्यांबाबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना चर्चा सुरू झाली. आमच्या काळात कृषी कायद्यांबाबत प्रत्येक राज्याचं मत मागवलं होतं अस शरद पवार म्हणाले. “हर्षवर्धन पाटील यांच्यासह नऊ राज्यातील कृषीमंत्र्यांचा समावेश असलेली समिती नेमली होती.या समितीकडून मसूदा तयार करुन राज्यांना अभ्यासासाठी दिला जाणार होता परंतु नवीन सरकार आलं आणि त्यांनी थेट कायदाच लागू केला.” 

कृषी कायद्याच्या बदलांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की “कायदा करताना कोणतीही चर्चा झाली नाही.राज्यांना विश्वासात न घेताच कायदा पास केला.राज्याचा विषय असताना केंद्रानं कायदे केले ही माझी तक्रार आहे. शेती क्षेत्रात बदल होणं आवश्यक आहेच. जिथे शक्य असेल तिथे बदल करण्याला विरोध नाही.परंतु त्यासाठी चर्चेने निर्णय घेणे आवश्यक आहे.”

दिल्ली आंदोलनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की “दिल्लीत चार-चार राज्यातील शेतकरी 70-72 दिवस ऊन, थंडी, वारा, पाऊस याचा विचार न करता रस्त्यावर येतो तेव्हा सरकारने संवेदनशील असलं पाहिजे. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा ज्येष्ठ मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.”

“पियुष गोयल हे आमचे मित्र आहेत, ते मुंबईचे आहेत. परंतु पियुष गोयल आणि शेती यातलं मला माहिती नाही. माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेती तज्ञ आहेत.सरकारनं हा विषय गांभीर्याने घेवून शेतकऱ्यांची अस्वस्थता पाहून ज्येष्ठ मंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.” शरद पवार यांच पियुष गोयल यांच्यावरच मत आहे.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments