खूप काही

शिवजयंतीची नियमावली बदलली; आता करा जय्यत तयारी…

कोरोना काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नियमावली लागू करण्यात आली होती, मात्र त्यामध्ये फक्त 10 लोकांनाच कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला समाजातून विरोध होऊ लागल्यानंतर सरकारने आपली नियमावली बदलली आहे. (government issues new Rules for celebrate of Shivjayanti)

ठाकरे सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमला आता 100 लोक उपस्थित राहू शकतील, अशी माहिती नव्या आदेशातून दिली आहे. याची स्पष्टता शासनाच्या गृहविभाग खात्याने दिली आहे.

दरवर्षीच्या 18 आणि19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीसह राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर जल्लोष केला जातो. अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक यांचेदेखील आयोजन केले जाते, मात्र या सगळ्यावर यावर्षी मज्जाव असणार आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढू नये, म्हणून राज्याच्या गृहविभागाने हा निर्णय घेतल्याचेही म्हटले जात आहे. (Shiva Jayanti rules changed)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments