कारण

आगरी कोळी समाजाचे मोठे नेते, सेनेची ताकद कालवश

ठाण्याचे माजी महापौर, शिवसेना उपनेते, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. तरे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत तरे यांची गेल्या महिन्याभरापासून तब्येत खालावली होती. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्यूपिटर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंत तरे यांच्या जाण्याने कोळी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोण होते अनंत तरे?

अनंत तरे तीन वेळा शिवसेनेचे ठाणे शहराचे महापौर होते. तसेच 2000 ते 2006 अशी सहा वर्षे ते शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार होते. ठाण्यातील राजकारणात शिवसेनेची मोट बांधण्यामध्ये तरेंचे मोठे योगदान होते.

अनंत तरे हे कोळी समाजाचे नेते होते. त्यांनी कायम कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली होती. तसेच एकवीरा देवस्थान ट्रस्ट, कार्लाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे देखील ते अध्यक्ष होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments