कारण

गाझीपूर बॉर्डरवर राऊत-टिकैत भेट, काय घडलं या भेटीत?

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे गेले 2 महिने पंजाब, हरियाणा, येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रासोबत झालेल्या सर्व बैठकीत अद्याप काही निष्पन्न झालं नाही. यानंतर आता आंदोलनस्थळी अनेक नेतेमंडळी दिसून येत आहेत. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर देखील पॉलिटिकल टूरिझम चालूच आहे.

आज गाझीपूर बॉर्डरवर भारतीय किसान यूनियन (BKU) चे नेते राकेश टिकैत यांची शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या पाच वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. संजय राऊत आपल्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश घेउन आले होते. शिवसेनेने याआधीच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (Shivsena Leader Sanjay Raut meets BKU Leader Rakesh Tikait on Ghazipur border)

राऊत-टिकैत भेट
संजय राऊत दुपारी एक वाजता आंदोलनस्थळी पोहोचले आणि लगेचच टिकैत आणि त्यांच्या साथीदारांची भेट घेतली. माध्यमांसोबत संवाद साधताना राऊत म्हणाले की, “ज्याप्रकारे 26 जानेवारी रोजी तोडफोड झाली आणि टिकैत आणि या आंदोलनाला संपविण्याचे प्रयत्न केले गेले, यामुळे आम्ही हे ठरवलं की संपूर्ण महाराष्ट्र, शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यावतीने समर्थन करणं आमची जबाबदारी आहे.”

यावेळी राकेश टिकैत म्हणाले की, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला अद्याप दिलं नाही आहे. 2019 पर्यंत BJP सोबत सत्तेत असणारी शिवसेना ही त्या 19 विरोधी पक्षांतील एक आहे ज्यांनी 29 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा बहिष्कार केला होता आणि शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे.”

कडेकोट सुरक्षाव्यवस्था
आंदोलनस्थळी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर मंगळवारी लोखंड आणि काँक्रीटच्या साहाय्याने बॅरीकेड लावण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर खिळे देखील लावण्यात आले आहेत, जेणेकरून आंदोलनकारी दिल्लीच्या दिशेने जाऊ शकणार नाहीत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments