कारण

मंत्री संजय राठोडांचा राजीनामा? संजय राऊत म्हणाले..

राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. भाजप देखील याप्रकरणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याप्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते.

दरम्यान, राज्यात या प्रकरणामुळे खळबळ माजली असताना या प्रकरणातील संशयित मंत्री संजय राठोड मात्र गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. अशातच, आज संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. राठोड यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोकं त्यासंदर्भात निर्णय घेतील. संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत, अनेक वर्ष आमदार आहेत आणि शिवसेनेचा चेहरा आहेत. मात्र आम्ही मागे म्हणालो त्याप्रमाणे पोलिस तपासाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत,” असे राऊत म्हणाले.

“राजीनाम्याबाबत मला माहिती नाही…”

संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी आपला राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्र केला. त्यावेळी ते म्हणाले, “संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला काही माहिती नाही. तुम्हाला याबाबत जास्त माहिती असेल.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments