खूप काही

शिवसेनेत दोन गट, संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा देण्याची शक्यता….

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांच्या टीका वाढल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सगळी कडे रंगू लागली आहे.येत्या शुक्रवारी ते पोहरादेवी येथे राजीनाम्याची घोषणा करतील अस सांगितल जात आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे याबद्दल काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे.पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. पण हे सगळं निव्वळ वेळकाडूपणा असल्याचा आरोप भाजपने केला आहे.देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.

या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एका गटानुसार संजय राठोड यांनी नैतिकता जपण्यासाठी राजीनामा द्यावा.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण पुढे आल्यापासून संजय राठोड यांचा फोन नॉन रिचेबल आहे. ते मीडिया समोर येऊन बोलत नाहीत यामुळे शिवसेनेच्या प्रतिमेला याचा धक्का लागत आहे म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. दुसऱ्या गटानुसार संजम राठोड हा विदर्भातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा आणि तळागाळातून वर आलेला नेता आहे. बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनीही संजय राठोड यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे तुर्तास संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे मत आहे.या आधी धनंजय मुंडेंवरही असे आरोप लावले होते पण त्यांचा राजीनामा घेतला नाही मग ह्यांचा का असा ही सवाल उठवला जातोय.

वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी गावातील बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे जिथे बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत असतात तिथे गुरुवारी संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितल जातंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments