खूप काहीकारण

पूजा अरूण राठोडचा गर्भपात! आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामूळे महाराष्ट्रात सध्या खळबळ माजली आहे. या प्रकरणात अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नसली तरी भाजपकडून सातत्याने राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप केले जात आहेत. संजय राठोड यांच्यासोबतच आणखी दोन नावांची सध्या चर्चा आहे. त्यामधील एक नाव म्हणजे अरूण राठोड (Arun Rathod).

सोशल मिडियावर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये काही क्लिपमध्ये अरूणचा त्या कथित मंत्र्यासोबत संवाद झाला होता. मात्र, गेले काही दिवस अरूण बेपत्ता आहे आणि त्यातच आज एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यवतमाळच्या रुग्णालयात “पूजा अरूण राठोड” नावाची मुलगी काही दिवसांपूर्वी दाखल झाली होती. रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार त्या मुलीचे वय 22 वर्ष आहे आणि तिचा 6 फेब्रुवारी रोजी गर्भपात करण्यात आला होता. पूजाने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती आणि तिचेही वय साधारण 22 ते 23 वर्ष आहे. त्यामुळे यवतमाळच्या रुग्णालयात दाखल झालेली पूजा ही नक्की पूजा चव्हाणंच आहे का? हा प्रश्र आता उपस्थित होतो आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे संशयित मंत्री संजय राठोड आणि अरूण राठोड हे दोघेही काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा सस्पेंस अधिकंच वाढताना पाहायला मिळत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments