खूप काहीफेमस

Sushant singh Rajput : जरी तो नसला तरी… बहिणीच्या रील व्हिडीओवर चाहते बरसले…

सुशांत सिंह राजपूत म्हंटल की डोळ्यांसमोर उभा राहतो तो सुशांतचा  निरागस चेहरा, त्याच ते गोड आणि मोहक हसू परंतु दुर्दैवाने आपण यापुढे हे कधी पाहू शकणार नाही. पण त्याची छोटी झलक किंवा त्याची एक छोटी छवी आपल्यला पाहायला मिळू शकते. कस? (Shweta singh kirti post her first ever reel video.)

तर वाचक मित्रांनो इथे आपण सुशांतच्या ज्या छवी बद्दल बोलत आहोत ते म्हणजे त्याचे डोळे. सुशांतची बहीण श्वेता आणि सुशांत यांच्या डोळ्यात साम्य असलीच नेटकरी मंडळी बोलत आहेत. काहीच वेळापूर्वी सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर तिचा पहिला रील्स विडिओ पोस्ट केला त्यानंतर चाहत्यांच्या कंमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव तिच्यावर झाला. ज्यात अनेक चाहत्यांनी तिचे डोळे अगदी सुशांत सारखे असल्याचे बोलले आहे. सोबतच तिच्या पुढच्या आयुष्यासाठीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुशांतच्या मृत्यूचं कोड उलगडण्यासाठी सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणाऱ्या श्वेताला काहींनी सुशांतच्या केस बद्दलही विचारणा केली परंतु श्वेताने यावर मौनच ठेवलं आहे. 

श्वेताच्या पहिल्या वाहिल्या रील्स मध्ये ती श्रीकृष्णा चे भजन गातानाचा अभिनय करताना दिसत आहे.  तिचे कपडे आणि साज श्रींगर यांमुळे ती फारच सुंदर दिसत आहे. श्वेताच्या या लूकचे नेटकऱ्यांनी फार कौतुक केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळून देण्यासाठी श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून वेग वेगळ्या देशात बरेच कैम्पेन चालू केले होते. 

श्वेताला लहानपणा पासूनच मॉडेलिंग आणि फॅशन ची ओढ होती. आणि तिच्या या आवडीला कार्य क्षेत्र म्हणून निवडण्यास तिच्या घरच्यांनीही तिला पाठिंबा दिला. चेन्नई च्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन मध्ये तिने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि द आर्ट इन्स्टिटयूट ऑफ कैलिफोर्निया सैन फ्रान्सिस्को ला पुढील शिक्षण घेण्यासाठी गेली. श्वेता सध्या तिचा पती आणि मुलानं सोबत अमेरिकेत राहते. 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments