आपलं शहर

मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसंदर्भात महत्त्वाची माहिती

मुंबईतील सर्व महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन मुंबईचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. MAHADBT पोर्टलवर हे अर्ज भरायचे आहेत.

2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यासह काही योजनांचे अर्ज भरण्यासाठी 3 डिसेंबरपासूनच MAHADBT पोर्टल सुरू झाले आहे. सर्व महाविद्यालयांनी या विविध शिष्यवृत्तींचा फायदा घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांना MAHADBT पोर्टलवर अर्ज करण्याची सूचना करावी.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक अकाऊंटला लिंक केलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपला आधर क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करायचे आहेत. त्यानंतर आपले MAHADBT अकाऊंट अपडेट करण्याचे आवाहन इंगळे यांनी केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments