फेमस

Sonu Sood : चाहत्याने केली अशी मागणी की, सोनू लावला थेट डोक्याला हात…

बॉलिवूड अभिनेता सोनु सूद हा लॉकडाऊन चालू झाल्यापासून अनेक लोकांची मदत केली आहे. लोकांना त्यांच्या गावी परत पाठवण्यापासून ते त्यांच्या अनेक गरजा पुरवण्या पर्यंत सगळ्या प्रकारची मदत केली. अजूनही लोक त्यांना सोशल मीडियावर त्यांच्याकडे मदत मागतात आणि ते मदत करण्याचा प्रयत्नही करतात. असच एका व्यक्तीने सोनु सूद कडे विचित्र मागणी केली आहे.

बसू गुप्ता नावाच्या एका युजर ने लिहिलं की ” सोनू सूद सर आमच्या गावा मध्ये एका माकडाने धुमाकुळ घालून खूप लोकांना जखमी केलं.या माकडाला कुठे तरी लांब जंगलात सोडून या अशी विनंती करतो.” ज्यावर रिप्लाय करत सोनू सूद म्हणाले की ” बस आता फक्त माकड पकडायच बाकी होत. पत्ता पाठव हे पण करून बघुया”

सोनू सूद यांनी या आधी शेतकऱ्याला ट्रॅक्टर पाठवला होता.अनाथ मुलांना सहारा देण्यापासून ते गरीब महिलांना घर देण्याचं वचन देण्यापर्यंत अनेक चांगली कामं केली आहेत.काही दिवसांपूर्वी सोनू सूद ने “किसान” नावाचा चित्रपट साईन केला आहे जो लौकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments