फेमस

Sonu sood : सोनू सूदने सुरू केला ढाबा, तंदूरी रोटी बनवत म्हणाला…

About the author

[author_image timthumb=’on’][/author_image] [author_info]Content goes here[/author_info]

नवी दिल्लीतील बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये गरीब लोकाचा देवता म्हणून काम करत होता.त्यांनी गरजू लोकांना आणि स्थलांतरित मजुरांना खूप मदत केली.

त्यांना घरी नेण्यापासून नोकरी पुरवण्यापर्यंत अडचणीत आलेल्यांना मदत करण्यासाठी सोनूने सुदने प्रयत्न केले. सोशल मीडियावर सोनू सूदची मदत घेणार्‍या लोकांची एक रांगच लागली आहे. सोनूनेदेखील लोकांचा आवाज ऐकत त्यांना मदत केली होती.

दरम्यान, सोनू आपल्या वेगवेगळ्या चेहऱ्याच्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करत आहे. यावेळी सोनूने स्वत: चा ढाबा उघडण्याविषयी सांगितले आहे. तंदुरी रोटी बनवून त्याने याबाबत माहिती दिली आहे.

सोनू सूदने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोल रोटी लाठताना दिसत आहे. रोटी लाठून झाल्यावर तंदूरच्या भांड्यात ठेऊन म्हणतो की माझ्यापेक्षा चांगली रोटी कोणी बनवू शकत नाही.

त्या व्हिडिओमध्ये सोनू सुद असे सांगतो आहे की सर्वोत्कृष्ट रोटी ही त्याला बनवता येते, म्हणून लवकर सोनू सूदच्या ढाब्यावर जा. सोनूचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत दिसून येत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड दशलक्षांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्याचे चाहतेदेखील ढाब्याचा पत्ता विचारत आहेत.

सोनू सुदच्या या नव्या चेहऱ्याचे कौतुक करून चाहते थकलेले नाहीत. एकाने असे लिहिले की, सर तुम्ही खूप वेगळे आहात. तर दुसर्‍याने लिहिले – सर, तुम्ही Legend आहात.

लॉकडाऊन संपल्यानंतरही सोनू संकटात सापडलेल्यांना मदत करत आहे. नुकताच त्याने चमोली दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या चार मुलींना दत्तक घेतले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments